कटू आहे पण सत्य आहे....

कटू आहे पण सत्य आहे....
जे... 
काल अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सात बहिणी डोंगरावर गर्दी करून असलेले हजारो पर्यटक हे डोंगरावर व डोंगराच्या बाजूला पुरात अडकल्या कित्येक गाड्या पाण्यावर तरंगू लागल्या पोलीस विभाग अजित सिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात तर तळोधी वनविभाग अरुप कन्नमवार वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनास कामाला लागला जीवाचे हाल करून पावसाच्या पाण्यात उतरून कर्मचाऱ्यांनी कोणतीही जीवित हानी न होऊ देता सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
हे करताना दिवसभर रस्त्याने होणारे अपघात, लोकांच्या गर्दीत होणारे झगडे, कोणा चेही वाईट होऊ नये म्हणून सलग पहाटेपासून जंगल परिसरात रस्त्याने ध्वजारोहणाच्या नंतर भटकणारे पोलीस कर्मचारी, व वन कर्मचारी, दिवसभर उपाशी असूनही रात्री खूप उशिरापर्यंत पाण्यात उतरून सर्वांना काढत होते आणि सर्वांना बाहेर काढले सुध्दा पण यातून समोर जे आले ते मात्र मी लिहित असलेले कटू सत्य आहे.जे पर्यटन सुरू ठेवा म्हणून दबाव आणणारे राजकीय लोक, पैशाच्या लालसेने  सर्वांचे जीव धोक्यात घालणारे काही अधिकारी, व स्वतःचा एक घर चालावा म्हणून शेकडो घरांच्या मुलांचे जीव धोक्यात टाकणारे काही लालची माणसं या सर्वांना बोचणार पण जे सत्य आहे ते सत्य (रोजगार, पर्यटन आणि पर्यावरण)हा तिन्ही बाबी एकाच गोष्टीशी निगडित आहेत.
पर्यावरणामध्ये पर्यटन झाला तर त्यातून रोजगार संधी उपलब्ध होते आणि ही रोजगार संधी त्या परिसरातील समित्यांना किंवा काही निवडक लोकांनाच पैसा पुंजी उपलब्ध करून देते. मात्र याचे जे दुष्परिणाम होतात ते शासकीय यंत्रणेला सोसावे लागते जसे काल जीवाचे हाल करून पोलिसांना व वन कर्मचाऱ्यांना सोसावे लागले मात्र यावेळी  पर्यावरणातून पर्यटन व त्यातून रोजगार संधी उपलब्ध करून पैसा कमावणारे वर्षाला दोन ते तीन लाख रुपये कमाई करणारी समिती असो किंवा इतर कोणतीही समिती जे या संकटकाळी गायब झाले. हेच एक मोठे कटू सत्य आहे. हे आजच नाही तर यापूर्वीसुद्धा मधमाशांचे हमले, त्यात मेलेले माणसं ज्यांना रात्री नऊ दहा वाजता डोंगरावरून स्वतःचे जीव मुठीत ठेवून स्वाब संस्थेच्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी व वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांनी रात्री नऊ ते  बारा वाजेपर्यंत डोंगरावरून उतरून आणले मात्र त्यावेळी सुद्धा समितीचे माणसं गायब झालेली होती. दिवसाच्या दोन वाजता झालेला हमला रात्री दहा वाजेपर्यंत लोक जिवंत होती मात्र व तिथल्या समितीने सहकार्य न केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला हे एक दुसरी बाजू जी एकदमच कटू आहे पण सत्य आहे.
ही एक बाजू असली तरी दुसरी बाजू.... 
पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा वाजवणारी आहे.
पर्यटन, रोजगार संधी आणि पर्यावरण या संदर्भाने पाहता जे पर्यटन पर्यावरणात होतात त्यातून रोजगार संधी होऊन पैसा तर उपलब्ध होतो मात्र.... त्याची दुसरी बाजू म्हणजे या परिसरामध्ये येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जंगल परिसरात फेकून परिसराचा सत्यानाश करतात. प्लास्टिक बॉटल, दारूच्या बॉटल्स, प्लास्टिकचे ग्लास, पात्र आणि प्लास्टिक पिशव्या डायपर आणि कंडोम सारख्या वस्तू पर्यावरणामध्ये इकडे तिकडे फेकून जातात.
 ज्या सात बहिणीच्या (पेरजागडच्या पवित्र मंदिर परिसरात) काही लोक आस्थेचा विषय समोर आणून पर्यटन सुरू करायला भाग पाडत आहेत जिथे शेकडो वर्षापासून कुठलाही मांसाहार चालला नाही नाही त्या ठिकाणी काल मंदिर परिसरात व आजूबाजूला नागपूर वरून आलेले काही गुंड प्रवृत्तीचे पर्यटक बळजबरीने मटन, चिकन बनवून खात बसलेले होते. हे सुद्धा पैशाच्या लालसेपोटी व त्या परिसरात न ठेवलेली व्यवस्था व समितीची हलगर्जीपणा निदर्शनास आणते.
✍🏻यश कायरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!