विरई या खेड्या गावातील आशिष बनला पोलिस उपनिरीक्षक
विरई या खेड्या गावातील आशिष बनला पोलिस उपनिरीक्षक
आशिष दिलीप गोंगले मुलपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या विरई या छोटयाशा गावातील माजी सरपंच श्री तुळशिरामजी गोंगले यांचा नातु व सेवानिवृत्त शिक्षक दिलीप गोंगले यांचा मुलगा आशिष दिलीप गोंगले हा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून आपल्या आजोबाचे स्वप्न पूर्ण करीत पोलीस उपनिरक्षक या पदी याची निवड झालेली आहे.
आशिषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, दहावी पर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय, मूल येथे झाले. त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून २०२१ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कोरोणामुळे अपयश आले. परंतु त्यांनी खचुन न जाता अभ्यासात सातत्य ठेवत जोमाने अभ्यास करून २०२२ च्या परिक्षेत यश संपादन केले.
आशिष याचाशी संपर्क केला असता त्यांने नियमीत अभ्यास व मेहनत करून आपले ठरविलेले ध्येय गाठून यश संपादन करता येते.
आशिष आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, काका-काकू, मोठे आई-बाबा, पत्नी, बहिण-भाऊ व आपल्या नातेवाईकांना देते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!