शिक्षक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश जिल्हेवार तर उपाध्यक्षपदी भक्तदास कांबळी यांची निवड
सावली - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सावलीची निवडणूक निवडणूक झाली असून त्यात परिवर्तन पॅनलने एकहाती निवडणूक जिंकली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी सुरेश जिल्हेवार, उपाध्यक्षपदी भक्तदास कांबळी तर मानद सचिवपदी सुनील खंडाळे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सावली या संस्थेच्या झालेल्या चूरशीच्या निवडणुकीत परिवर्तन आघाडीची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली. शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून सुरेश जिल्हेवार, उपाध्यक्षपदी भक्तदास कांबळे, तर मानद सचिव पदी सुनील खंडाळे यांची एक मताने निवड झाली. संचालक पदी विजय बावणे, चंदन बिलवणे, लक्ष्मण सोयाम, आदेश मानकर, कु रजनी रामगीरवार, व स्वप्निल डोईजड विराजमान झाले. प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था सावली ही जिल्ह्यात नावाजलेली संस्था असून स्वतःची प्रशस्त इमारत व कोट्यावधी रुपयांची उलाढाल आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!