सौ. गीता जाधव (आगलावे) सेट परीक्षा उतीर्ण
सौ. गीता जाधव (आगलावे) सेट परीक्षा उतीर्ण
कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील संगणकशात्र विभागातील प्राध्यापिका गीता जाधव (आगलावे) या कम्प्युटर सायन्स विषयात दि.07 एप्रिल,2024 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत खुल्या प्रवर्गातून ऊतीर्ण झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. अनिता वाळके, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर व सर्व प्राध्यापकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत त्यांनी हे यश मिळविले, त्याबद्दल त्यांचे सर्वाकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. गणेश आगलावे यांच्या त्या पत्नी आहेत. या यशाचे श्रेश त्यांनी आपले आईवडील, गुरुजनवर्ग व पती यांना दिलेले आहे. महाविद्यालयाने त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ल्या. सत्काराबदल त्यांची संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी व प्राचार्या डॉ . अनिता वाळके व सर्व प्राध्यापकांचे आभार मानले आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!