हिरापुर टोल नाक्याजवळ ट्रकचि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार





सावली : गडचिरोली- चंद्रपूर महामार्गावरील हिरापूर टोल नाक्याजवळ बुधवारी (31 जुलै) दुपारी  १ वा. श्री. सुरेश
आगरे  (50) रा. भेजगाव
इसमाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलने आपल्या
गावि परत जात परत असताना हिरापूर
नाक्याजवळ मोटारसायकलचा तोल गेला आणि सदर व्यक्ती रस्त्यावर खाली पडले
तेवढ्यात भरधाव ट्रक क्र.
एमएच 34 एबी 3533 हि त्याच्यावर चढल्याने चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा
मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. सावली पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!