मूल शहरात पथविक्रेता समितीची अविरोध निवड

मूल शहरातील पथविक्रेता समितीची बिनविरोध निवड, नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान


मूल प्रतिनिधी

पथविक्रेता समिती अधिनियम 2014 तरतुदीनुसार मूल शहरात पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यामध्ये शासकीय विभाग, इतर मंडळे आणि पथविक्रेत्यांचे आठ सदस्य असतात. एकुण 20 सदस्यांपैकी 8 सदस्य पथविक्रेत्यांमधून निर्वाचित करून द्यायचे असतात. त्या अनुषंगाने 31 जुलै रोजी निवडून जाहीर केली होती. मात्र आठ च नामनिर्देशन फॉर्म आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

सर्वसाधारण खुला गटातून अमित रामदास राऊत, धर्मेंद्र बालाजी सूत्रपवार, नलिनी दिनेश आडपवार, अनुसूचित जाती मध्ये अरुण दादाजी खोब्रागडे, अनुसूचित जमाती मध्ये धनराज गणपत कुमरे, इतर मागास प्रवर्ग महिला मध्ये वैशाली प्रमोद मशाखेत्री, अल्पसंख्यांक महिला राखीव नुरजहा मजहर बेग, दिव्यांगा मधून अरविंद देविदास बुटले यांची नगर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली.

निवडून आलेल्या आठ सदस्यांना प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पथविक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सर्व बिनविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!