नवभारत कन्या विद्यालय मूल ची विद्यार्थिनी परी बावनवाडे ही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
नवभारत कन्या विद्यालय मूल ची विद्यार्थिनी परी बावनवाडे ही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिप करिता पात्र झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
इयत्ता पाचवी मध्ये शिकत असताना परिने महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी प्रतिष्ठित समजली जाणारी स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती. त्यात ती गुणवंत झाल्याने, आज नवभारत कन्या विद्यालय मुल येथे मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे हस्ते तिचा संविधानाची छोटी पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला.
परीच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तीचे अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!