प्रा.राजेश्वर राजूरकर यांनी स्विकारला मानाचा " केंद्राई भूषण पुरस्कार -२४
प्रा.राजेश्वर राजूरकर यांनी स्विकारला मानाचा " केंद्राई भूषण पुरस्कार -२४
चांदोरी ता.निफाड येथे नविन तंत्राने एकरी १०० मे.टन ऊस ऊत्पादन चर्चासत्र व केद्राईभूषण पुरस्कार सोहळा मोठ्या संख्येंने ऊस ऊत्पादक शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी ऊपस्थितीने ऊत्साहात पार पडला,केद्राई कृषी व ग्रामीण विकास संस्था नांदूर खुर्द नासिक,नेटाफिम इरिगेशन ,डिवाईन अँग्रो,डेबाँन कंपणी यांचे सहकार्याने व मा.डाँ. भरत रासकर साहेब ऊस तज्ञ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र,डाँ.अरूण देशमुख सर जल तज्ञ तथा व्यवस्थापकीय संचालक नेटाफिम,मा.राजेंद्र पाटील,साखर तज्ञ,मा.बाळासाहेब क्षिरसागर,शिक्षण व बँक पदाधिकारी,मा.रामभाऊ माळोदे,शेती ऊद्योजक तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मान्यवर ऊपस्थित होते,सूत्रसंचालन व आयोजक केद्राई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाँ.व्ही.पी.शिंदे यांनी केले.प्रा.राजूरकर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, लेखन, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, संशोधन, कृषि विस्तार कार्य इत्यादी कार्याची दखल घेवून संस्थेने पुरस्कार करीता निवड केली आहे.सध्या प्रा.राजूरकर हे संचालक म्हणून महा आॅरगॅनिक अॅन्ड रेस्यीड्यू,फी फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र आणि सितांगन अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मारोडा येथे सेवा देत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!