इ-केवायसी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन e-kyc
माहे नोव्हेंबर 2023 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मुल तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. शेतपिक नुकसान झालेल्या खातेदारांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शेतपिक नुकसान झालेल्या खातेदाराच्या याद्या E-Panchnama Payment Disbursement या पोर्टलवरुन ऑनलाईन अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने आधार कार्ड व बँक पासबुक प्रत तलाठी यांचेकडे सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना व प्रसिद्धी देण्यात आली. अद्यापही काही खातेदार यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक प्राप्त न झाल्यामुळे त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली नाही. करीता मुल तालुक्यातील सर्व पात्र खातेदार यांना सूचित करण्यात येत आहे की सदर पोर्टल वर माहिती अपलोड करण्याची, अर्ज मंजुरी व e-kyc प्रक्रिया करणे ही अंतिम संधी दि. 15/07/2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.
तसेच सदर याद्या अपलोड झाल्यावर खातेदारांना e-kyc करणे अनिवार्य आहे व त्यानंतरच खातेदारांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. अपलोड झालेल्या याद्या सर्व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द केलेल्या आहेत, त्याबाबत दवंडी देण्यात आलेल्या आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र येथे सुद्धा याद्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्यापही काही खातेदार यांनी e-kyc केलेले नाही.
सर्व पात्र खातेदार यांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांनी अद्यापही आधार कार्ड व बँक खाते क्रमांक दिलेले नाही संबंधित तलाठी यांना दि. 14/07/2024 पर्यंत सादर करावे व ज्यांनीe-kyc केलेले नाही त्यांनी जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन दिनांक 15/07/2024 पर्यंत e-kyc करून घ्यावे. #e-kyc #revenue
तहसीलदार मुल



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!