काँग्रेसने उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार - धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विधानसभा चिमूर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२६/०७/२०२४ राज्यात येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांकडून विधानसभा उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसने मला उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठे औद्योगिक व्यावसायीक उपक्रम राबवून चिमूर विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देणार असे मत धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विधानसभा चिमूर यांनी व्यक्त केले. व चिमूर नागभिड भिसी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या हस्ते गरजु नागरीकांना व विद्यार्थ्यांना नोटबुक , छत्री व टि - शर्ट तसेच कापडी पिशवी चे वितरण करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते वामन गेडाम, राजु लोणारे , नागेश चट्टे  रत्नाकर विटाळे, शांताराम शेलवटकर, प्रदिप तळवेकर , विलास मोहिनकर , संदिप घोडमारे , दिलीपराव गंधारे , जाबिर कुरेशी , अक्षय लांजेवार , शंकर माहुरे व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!