"हर घर नलसे जल" योजनेची डोणी ला प्रतिक्षा
केंद्र सरकारने सुरू केलेली 'हर घर नलसे जल' योजना चंद्रपूर तालुक्यातील डोणी या आदिवासी गावात फसली असून, महिलांच्या डोक्यावरील घागरीच कायम आहेत. #Har_Ghar_Jalse_Nal
मागील अनेक महिण्यापासून, डोणी गावात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. गावातील दोन विहीरीवरच गावकर्यांची तहाण भागविली जात आहे. शेकडो वर्ष जुन्या पारंपारीक विहीरीही आता आटल्या असून, दोन तीन घागरी पाणी तेवढे मिळत असल्यांने, शंभर टक्के आदिवासी गाव असलेले डोणी पाण्यावाचून तहाणलेले आहे. विहीरीत पाणी नसल्यांने महिलांच्या डोळ्यात पाणी तरळत असून, गावचा पाणी प्रश्न सोडवावा अशी विनंती गावातील नागरीक गावात येणार्या प्रत्येक अधिकारी आणि नेत्यांना करीत आहे.
'हर घर नलसे जल' ही योजना डोणी गावात सुरूच झाली नसल्यांचे उघड वास्तव आहे.
काय आहे 'हर घर नलसे जल'?
स्वस्थ जीवन जगण्याकरीता या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यांची योजना आहे. देशातील सर्व नागरीकांना भरपूर आणि स्वच्छ पाणी या योजनेअंतर्गत देण्याची तरतूद आहे.
15 आॅगष्ट 2019 मध्ये लाल किल्यावरून देशाला संबोधीत करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 'हर घर नलसे जल' या योजनेची घोषणा केली. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरविला जाईल असे आश्वस्त करण्यात आले.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
''मै आज लाल किले से घोषणा करता हूं कि आने वाले दिनों में हम जल जीवन मिशन को और आगे बढायेंगे । केंद्र और राज्य संयुक्त रूप से इस जल जीवन मिशन पर काम करेगी। हमने आने वाले वर्षों में इस मिशन पर 3.50 लाख करोड रूपये से अधिक खर्च करने का वादा किया है ।
या योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 सप्टेंबर 2019 रोजी देशातील सर्वच सरपंच यांना पत्र पाठवून ही योजना सामाजीक स्वास्थाकरीता राबविण्याचे आवाहन केले.
प्रत्येक व्यक्तीमागे 55 लिटर पाणी देता येईल असे नियोजन या योजनेत करावयाचे होते. लोकसंख्यानुसार तेवढ्या क्षमतेच्या पाणी टाकी (जलकुंभ) बांधकाम करावयाचे होते.
देशभर या योजनेचा गवगवा झाला मात्र डोणीत अजूनही 'हर घर नलसे जल' योजनेचा पत्ताच नाही.
##Har_Ghar_Jalse_Nal #PM #Modi



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!