चिमूर शहरात भीषण पाणी टंचाई
३ किमी अंतर गाठून आणावे लागते पिण्यासाठी पाणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील येत असलेल्या चिमूर नगर परिषद क्षेत्रात उमा नदीने वेढा घातला असून पूर्णपणे नदी हि कोरडी पडली असल्याने याचा फायदा रेती माफिया योग्य प्रकारे घेत असून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा या माफियांनी केला आहे. यामुळे मुक्या जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.तर हिच पध्दत चिमूर शहरातील जनतेला पत्करावी लागत आहे. घरी मारलेली बोर तसेच विहिरी कोरड्या पडल्या असल्याने ३ कि.मी.अंतरावर असलेल्या नगर परिषद चिमूर च्या उमा नदी किनाऱ्यावरील पाणी फिल्टर प्लांट हे दुचाकीने व सायकल ने गाठून पिण्यासाठी पाणी जनतेला आणावे लागत आहे. विविध प्रकारचे निवेदने नगर परिषद ला देऊन सुद्धा टॅंकर द्वारे पाण्याचे वाटप शहरात केले जात नसल्याने जनतेला मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर नगर परिषदेने अशा अवस्थेत कसलीही प्रतीक्षा न करता पाणी पुरवठा करावा अशी मागणी जनता करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!