खेडी गोंडपिपरी हायवे काम निकृष्ट दर्जाचे - जुने काम नवीन दाखविण्याचा प्रकार समोर
खेडी गोंडपिपरी हायवे काम निकृष्ट दर्जाचे - जुने काम नवीन दाखविण्याचा प्रकार समोर
सावली - खेडी गोंडपिपरी पोडसा या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड असतांना खेडी जवळील नाल्यावर जुनेच पाईपला साईड भिंत देऊन नवीन काम असल्याचे दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे. सदर कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरी यांचे दुर्लक्ष होत आहे.
खेडी गोंडपिपरी पोडसा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरु आहे. काम संथगतीने सुरु असल्याने अनेक अपघात होऊन जिवसुद्धा गमवावा लागला आहे. या मार्गांवर अनेक आंदोलने झाली परंतु कामाचे कंत्राट सत्तेतील एका राजकीय नेत्याचे असल्याने काही फरक पडताना दिसत नही. खेडी भवराला मार्गांवर नाला असून पावसाळ्यात प्रवाह भरपूर असतो. काही वेळा रोडवरून पाणी जात असतो. त्या ठिकाणी पूल किंवा मोठे पाईप टाकण्याची गरज आहे. सुरवातीला मोठे पाईप कामाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात काम करताना तेथील पाईप दुसरीकडे हलविण्यात आले. अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या पाईपलाच साईड वाल देऊन नवीन काम असल्याचे दाखविण्यात येत आहे. याबाबत गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता येडे यांचेशी संपर्क साधला असता प्लॅन पाहून काम करून घेऊ असे थातूरमातुर उत्तर दिले. सदर निकृष्ट काम पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, चांदलीचे तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गुंडावार यांनी थांबवला होता मात्र कंत्राटदराने कार्यकर्ते तिथून जाताच काम करून टाकला. कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!