भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी पाल यांचेवर कारवाई करा - काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांची मागणी
भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी पाल यांचेवर कारवाई करा - काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांची मागणी
सावली - तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी पाल हे लोकांची कामे न करता उद्धट वागणूक देतात, कामे वेळेवर करीत नसल्यामुळे त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सावली येथील भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी पाल यांचेकडे आखीव पत्रिका तयार करणे, आखीव पत्रिका फेरफार करणे व सातबारा फेरफार करणे ही कामे असतात. मात्र कार्यालयात दरवाजा बंद करून ठेवणे, कामासाठी गेलेल्या नागरिकांना उलट बोलणे, उद्या, परवा या असे बोलून कामे प्रलंबित ठेवणे, अनेक प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित आहेत. यामुळे शहरातील अनेक कुटुंब घरकुळापासून वंचित आहेत. अशा प्रकारचा त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांच्या कमाविषयी शहरात रोष आहे. याचा अनुभव सावलीच्या नगरसेवकांनाही आलेला आहे. त्यामुळे पाल यांचे कारवाई करण्याची मागणी तालुका उप अधीक्षक निकुरे, तहसीलदार प्रांजली चिरडे यांचेकडे सावली नगरपंचायतीचे पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य सभापती प्रितम गेडाम, नगरसेवक नितेश रस्से, गुणवंत सुरमवार,नगरसेवीका ज्योती गेडाम, ज्योती शिंदे,अंजली देवगडे, माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार, सामाजिक कार्यकर्ते आकाश खोब्रागडे, निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, कुणाल मालवनकर आदी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!