हाॅर्वेस्टर अंगावरून गेल्याने महिला ठार, रस्त्यावरील रेतीचा ढीग ठरला काळ.
तळोधी (बा.) :-
सावरगाव - वाढोणा रोडवर दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकिवरून महिला खाली पडली. मागेच येत असलेल्या हारवेस्टर च्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजताचे दरम्यान घडली.
तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येतं असलेल्या सावरगाव- वाढोणा रोडवर आज दुपारी एक वाजताचे दरम्यान नेरी येथुन राजेश बावने व कुसुम उकुंढे (वय 50 वर्ष) हे दोघेजण वाढोणा येथे मृतकाचे मुलीकडे दुचाकी (स्कुटी) क्रमांक एम.एच ३४-सि.एक्स.८८७१ या गाडीने जात असताना, हार्वेस्टर ला ओव्हरटेक करून समोर जात असताना बाजूला ठेवलेल्या रेतीच्या ढिगावरून गाडी स्लिप झाल्याने व गाडीवरून मागे बसलेली महिला खाली पडली दरम्यान बाजुने जात असलेल्या हाॅरवेस्टरच्या मागील चाकाखाली आली असता कुसुम उकुंढे ही महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलिस करित आहे.
मात्र खेडेगाव परिसरामध्ये रस्त्या रस्त्यावर रेती व गिट्टीचे ढग तसेच गुरेढोरे बांधलेले असतात यामुळे दळणवळण करताना दुचाकी किंवा चार चाकी चालवणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागते. तर ज्या ठिकाणी रेतीच्या ढिगार्यावरून गाडी स्लीप होऊन पडून आज महिला मृत पावली या ठिकाणी या आधी दोनदा वाढोणा येथील युवकांचा गाडी स्लीप होऊन पडल्याने अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. यामुळे कारवाई फक्त हार्वेस्टर वाल्या वरच न होता अशा पद्धतीच्या अपघातास कारणीभूत असलेल्या व बेवारसपणे आपल्या गिट्टी, रेती, मुरुम, विटा, बैलगाडी, ट्राक्टर, चारचाकी वाहने, लाकडे काड्या, रस्त्यावर ठेवणाऱ्या लोकांवर सुद्धा कार्य कारवाई व्हायला पाहिजे अशी या रस्त्याने गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांचे म्हनने आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!