लग्न वरात घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स व कंटेनरची एकमेकांना धडक , वऱ्हाळी जखमी...


    

   नागभीड तालुक्यातील घटना..


 सिंदेवाही वरुन नागपुरला एका लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या खाजगी  ट्रॅव्हल्सला शुक्रवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागभीड - नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिकली गावा जवळ कंटेनर व खाजगी ट्रॅव्हल्सची आमने सामने धडक झाल्याने या अपघातात ८ ते ९ जणं जखमी झाल्याची घटना घडली. ...

 सिंदेवाही येथिल कावळे कुटुंबातील नागपूर येथे शुक्रवारला लग्न कार्य होते. त्यासाठी एका खाजगी ट्रॅव्हल्सने सिदेवाही वरून नागपूरला सकाळच्या सुमारास  जात असतांना नागभीड - नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर बिकली फाट्या जवळ नागपुर वरुन येत असलेल्या कंटेनरने चालकाच्या बाजूने खाजगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली.त्यात ट्रॅव्हल्सच्या चालकाचे नियंत्रण सुटले.त्यात बसलेल्या वराडी  यांना मार लागला आहे. यात आठ वऱ्हाळी जखमी झाले . जखमीना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे. तर कंटेनरचा चालकाला डोक्याला व पायाला  मार लागला आहे. सुदैवाने कुठलीच जीवीत हानी झाली नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!