साखरी येथे इसमावर प्राणघातक हल्ला - आरोपी सावली पोलिसांच्या ताब्यात
साखरी येथे इसमावर प्राणघातक हल्ला - आरोपी सावली पोलिसांच्या ताब्यात
सावली - साखरी येथे सुरेश मारोती भुरसे या शेतकऱ्याने शेतालगत असलेला आरोपी मंगेश मुळेवार यास शेत मोजणीची नोटीस देण्यास घरी गेला असता त्याचेशी वाद घालत चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्रौच्या सुमारास घडली. जखमी इसमास गडचिरोली येथे उपचाराकरिता भरती केले असून आरोपीस सावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोजणीची नोटीस भूमी अभिलेख विभाग स्वतः न देता शेतकऱ्यांना दिल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
सावली तालुक्यातील साखरी येथील शेतकरी सुरेश भुरसे यांनी जमीन मोजणीकरिता तालुका भूमी अभिलेख सावली येथे प्रकरण दाखल केले. विभागाने लगतच्या शेतकऱ्यांना हजर राहण्याचे नोटीस सुरेश भुरसे यांचेकडे दिले. नोटीस घेऊन सुरेश भुरसे हे मंगेश मुळेवार यांच्या घरी गेले असता वाद घालत आरोपी मुळेवार त्यांच्यावर चाकूचा हल्ला झाला.हल्ला होताच आपला जीव मुठीत घेऊन आपल्या घराकडे सुरेश भुरसे यांनी धाव घेतली पण रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. जखमीला तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सावली पोलिसांना माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीस अटक केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!