सोनूली येथे सुगंधीत तंबाखू, गुटखा जप्तीतळोधी बा. पोलीसांची कार्यवाही.
यश कायरकर (तालुका प्रतिनिधी.)
आज रोजी गोपनिय माहीती मिळाली की, श्री. लालाजी मनोहर शेंडे वय. 30 वर्षे रा.सोनुली (बु) हे आपल्या किराणा दुकानात शासणाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधित तंबाखुचा साठा करुन विक्रीचा व्यवसाय करतात . त्यानुसार आज रोजी पथकासह पंचासमक्ष छापा कारवाई केली असुन त्यांचे घर व दुकानात शासणाने प्रतिबंधीत केलेली व मानवी आरोग्यास घातक असलेली SEVEN STAR हुक्का सुंगधित तंबाखु , मज्जा 108 हुक्का शिशा तंबाखु, होला हुक्का शिशा तंबाखु , ईगल हुक्का शिशा तंबाखु अशाप्रकारचा सुंगधित मज्जा तंबाखु चा साठा मिळुन आलेला आहे. पंचासमक्ष एकुण 29320/- रु किचा मुद्देमाल मिळुन आला असुन आरोपी नामे श्री. लालाजी मनोहर शेंडे वय. 30 वर्षे रा.सोनुली (बु) यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात तळोधी पोस्टे अप क्र. 54/24 भादवि कलम 328, 273, 188 सहकलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) (i),26(2) (iv), 30(2)(a), 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे , पोउपनि चंद्रकांत लांबट , पोहवा/ विजय वाकडे , नापोशि / सचिन साखरकर , मपोशि / संगिता कोसनवार , पोशि / राहुल चिमुरकर , पोशि / अमर पिद्दुरकर अशा पथकाने केलेली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मानकर करित आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!