आगीत होरपळून जनावराचा मृत्यू...





वरोरा...जगदीश पेंदाम


वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे आज दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या मंडपाला आग लागली या आगीत बांधून असलेले म्हशीचे पिल्लू यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे..  
       चारगाव खुर्द येथील  शेतकरी विलास चवले यांच्या शेतात दुपारच्या वेळी अचानक आग लागल्याने या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले या आगीत तीन म्हशी अंदाजे रक्कम एक लाख पन्नास हजार तसेच त्यांचे तीन पिले अंदाजे रक्कम तीस हजार रु. तसेच जनावरांचा चारा यात गवांडा, कुटार, तनिस जळून  राख झाली यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला शासन कडून  आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावातील शेतकरी यांनी प्रशासनाला केली आहे. 
     उन्हाळ्याची चाहूल लागताच विलास चवले यांनी आपल्या शेतामध्ये जनावराच्या सोई करिता मंडपाची सोय केली होती या मंडपात त्यांच्या कडे असलेले सर्व जनावरे दुपारच्या वेळेस बांधून ठेवले शिवाय मंडपात  जनावरांचा विविध चारा देखील होता आज अचानक दुपारच्या वेळेस आग लागल्याने सर्व जळून राख झाले सदर ही आग विद्युत तारांच्या स्पर्शाने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे गावकऱ्याकडून  सांगितले विशेष म्हणजे शेती सोबत जोळ धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या विलास चवले या शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असुन सुदैवाने त्यांचे काही जनावरे दूर झाडाच्या खाली बांधून असल्याने बैलजोडी तसेच काही जनावरे सुखरूप बचावले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!