भारतीय लोकशाही (राजकीय, प्रशासन आणि समाज)



भारत एक गणराज्य देश म्हणून जगात आपली ख्याती मिरवत असला, तरी लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी,  लोकांकडून चालणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. असे असले तरी लोकशाही चे मुख्य तिन घटक ज्या व्यवस्थेवर आपली संपूर्ण लोकशाही अवलंबून आहे. ती राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्था या तीनही घटकानं पैकी एकादी घटक मागे राहीला किंवा त्या घटकाकडे दुर्लक्ष करून जर आपली लोकशाही उभी राहत असेल तर खरंच आपण लोकशाही आहे असे म्हणत येईल का? या वर मात्र आजही प्रश्नचिन्ह आहे. 


सध्या भारतात २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण संपूर्ण देशात चागलेच तापलेले आहे, निवडणूक म्हणजे एक मोठा उत्सव, जेथे राजकारण, प्रशासन आणि समाज या उत्सवात भाग घेत जगातील सर्वात मोठी लोकशाहीचे उदाहरण म्हणून या निवडणुकीच्या पर्वाकडे आपण बघत असलो तरी खरोखरच निवडणूक पूर्ण झाल्यावर समाज हा घटक लोकशाहीमंध्ये तितक्याच तत्परतेने भाग घेतो का? जितक्या तत्परतेने आपण आज राजकारण, राजकीय व्यवस्था आणि ही व्यवस्था चालवणाऱ्या पुढऱ्यानबद्दल किंवा राजकीय पक्षाबद्दल आपण समाज म्हणून जितकी चर्चा करतो तेवढीच चर्चा समाज म्हणून लोकांचे प्रश्न काय आहे यावर करतो का? याचा विचार आपल्याला करावा लागेल. 
राजकारण, निवडणूक आणि बहुमत मग त्यातून निर्माण होणारे सरकार, याच सरकारच्या नेतृत्वाखाली चालणारी आपली प्रशासकीय व्यवस्था आणि याच संपूर्ण घटकांच्या आधारे चालणाऱ्या आपल्या समाजाला आपणही लोकशाही फक्त एक घटक नाही तर मुख्य घटक आहे याची जाणीव असण सुद्धा तेवढच असणं आवश्यक आहे. कारण याच लोकशाहीत आपल्याला राज्यघटणेने श्रीमंत असो की गरीब सर्वांनाच समान मताचा अधिकार दिलेला आहे.  तरी ज्या पद्धतीने देशातील एक व्यवसायिक घटक आपल्या मागणी किंवा आपल्या गरजेनुसार राजकीय व्यवस्थेवर प्रभावित करतांना दिसतो तेवढ्याच प्रभावीपणे एक सामान्य किंवा समाजातील बहुसंख्य उपेक्षित घटकाच्या मागण्या काय आहे किंवा समाज म्हणून आरोग्य, शिक्षण, रोजगार, घर, शेती, संस्कृति,भाषा आणि यासोबत आमची जल, जंगल आणि जमीन या सर्व विषयांवर सुद्धा समाज म्हणून चर्चा होत आहे का ? याचा विचार करणे गरजेच आहे. राजकीय पुढाकारींनी सुद्धा आपण जनेतेचे प्रश्न काय आहे यावर चर्चा करणे अपेक्षित असले तरी केवळ जात, धर्म आणि काल्पनिक विकासाचे स्वप्न न दाखवता आपण सुद्धा समाजाचे प्रश्न आणि लोकांच्या खऱ्या गरज काय आहे याचा अभ्यास करणे सुद्धा तेवढच महत्वाचे आहे. 
आज आपण लोकशाही म्हणून राजकीय, प्रशासकीय व्यवस्था जितकी प्रगत झाली तितकाच सामाजिक घटक प्रगत झाला का ? याकडे कडे सुद्धा त्याच तत्परतेने बघण आवश्यक आहे.  कारण जेव्हा एक प्रजासत्ताक भारत देश म्हणून आपण जगात मिरवत असलो, ज्या राज्यघटनेला आपण स्वीकारुन आपण भारतीय लोकशाही ची व्यवस्था उभारली त्या घटनेचा अभ्यास समाजाला सुद्धा करणे तेवढेच आवश्यक आहे.  कारण जोपर्यंत आम्हाला यांचे एक नागरिक म्हणून एक भारतीय संविधानाने काय अधिकार दिलेले आहे. यावर समाजात लोकांमध्ये, माध्यमानंमंध्ये जो पर्यन्त चर्चा होणार नाही, तो पर्यंत समाज हा घटक लोकशाही मंध्ये केवळ निवडणूकी पुरताच मर्यादित राहील. मग सत्ता असो वा प्रशासन ही जनतेच्या सेवेसाठी नाही तर त्यावर राज्य करण्याच्या प्रवृत्ती  कार्य करत राहील. लोकशाही मधील समाज हा घटक राजकारण, प्रशासन ना सोबतच प्रगत झाल्यास खऱ्या अर्थाने लोकशाही या देशात टिकून राहील........... धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!