चिमूर तालुक्यात तलाठ्यांच्या आशिर्वादाने रेती माफियांची चांदीच चांदी


दोन ट्रॅक्टर पकडून हेतू पुरस्पर सोडल्याची चर्चा 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात रेती माफियांद्वारे उमा नदी पात्रातून तसेच जंगल परिसरातून रेतीची चोरी करून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे.परंतु लोकसभा निवडणुक लागल्याने सर्व अधिकारी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याने तलाठी यांची या माफियांशी मैत्री असल्यागत चित्र दैनंदिन दिवस रात्र बघायला मिळत आहे.चिमूर शहरात सर्वत्र मुख्य मार्गावर CCTV कॅमेरे चोरट्यांवर नजर ठेवणे तसेच गुन्हेगारी वाढू नये याकरीता लावण्यात आली असून याकडे पोलीस कधीच लक्ष देतांना दिसत नाहीत.तर चक्क हि चोरीची रेती पोलिसांच्या नजरेसमोरून वाहतूक केली जाते. हि चोरीची रेती चिमूर तहसील च्या प्रांगणात महसूल विभागाच्या कार्यालयालगत स्ट्रॉंग रुम च्या इमारतीकरीता वापरल्या गेली असून उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी ट्रॅक्टरवर कारवाई न करता याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच पंचायत समिती चिमूर च्या प्रांगणात नवीन पशु वैद्यकीय हॉस्पिटल च्या कामावर सुद्धा लाखो रुपयांची चोरीची रेती दिवस - रात्र टाकली जात आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार तसेच तलाठी मंडळ अधिकारी यांना असून यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रेतीची वाहतूक करणारे माफिया हे सर्वसामान्य नसुन राजकिय राजाश्रय असलेल्या नेत्यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय असल्याचे कळते यामुळे या रेती माफियांवर कारवाई करण्यास अधिकारी घाबरत असल्याची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.दिनांक.१०/०४/२०२४ ला दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान तलाठी यांनी रेतीने भरलेली शिरपूर नेरी मार्गावर २ ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली असून रेती माफियांनी अक्षरशः पकडलेली ट्रॅक्टर तलाठ्यांच्या हातातून हिसकावून पळवून नेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.अशा घटना प्रथमतः घडल्या नसून अनेकदा हा प्रकार घडला आहे.याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत पोलीस स्टेशन चिमूर याठिकाणी तक्रार सुद्धा दाखल केली आहे.परंतु अशा घटना वारंवार का घडतात असा ? जनतेला पडला आहे.जिल्हाधिकारी यांचे याकडे लक्ष का नाही ? राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हि ट्रॅक्टर असल्याने अधिकारी यांचेवर दबावतंत्र निर्माण तर झाला नसावा अशीही चर्चा जनतेमध्ये रंगू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!