अनेक मतदार मतदानापासून वंचित - बूथाची संख्या कमी केल्याचा परिणाम

अनेक मतदार मतदानापासून वंचित - बूथाची संख्या कमी केल्याचा परिणाम
सावली - मतदारांची संख्या वाढत असताना बूथची संख्या वाढवण्या ऐवजी कमी केल्याने अनेक गावात गर्दीमुळे रात्रौपर्यंत मतदार मतदान करू शकले नाही. त्यामुळे मतदानापासून मतदार वंचित राहिले आहे. मतदान जास्तीत जास्त व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या स्पर्धा, जनजागृती अभियान राबवून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केल्या जाते, ग्रामीण भागातील मतदार शहरी मतदारापेक्षा मतदान अधिक करतात. यावेळी लोकसभेतील ग्रामीण भागातील मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे. हा आकडा वाढला असता मात्र सूर्य आग ओकत असतांना बूथाची संख्या कमी केल्याने अनेक मतदार मतदान न करताच परत गेल्याचे दिसून येत होते. चांदली बुज., खेडी, हिरापूर येथे दरवेळी दोन बूथ असताना यावेळी एकच बूथ दिल्याने मतदारांची दिवसभर गर्दी होती. निवडणूक ठरलेल्या वेळात खेडी, हिरापूर येथे मतदान होऊ न शकल्याने रात्रौ 8 ते 10 वाजेपर्यंत मतदारांना वाट पाहून मतदान करावे लागले. यामुळे मतदारांमध्ये प्रशासनाप्रती रोष दिसून येत होता.
(खेडी बूथवरील सायंकाळी सहा वाजताची गर्दी) त्यामुळे पुढील होणाऱ्या निवडणुकांमध्ये पूर्वीप्रमाणे बूथाची संख्या ठेऊन मतदारांची काळजी घ्यावी ही मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!