कन्हाळगावात चालला रात्री १०:३५ पर्यंत मतदान. (असुविधेमुळे निर्माण झाली होती तनावाची स्थिती)

कन्हाळगावात चालला रात्री १०:३५ पर्यंत मतदान.
(असुविधेमुळे निर्माण झाली होती तनावाची स्थिती)
यश कायरकर, तालुका प्रतिनिधी:
       नागभिड तालुक्यातील कन्हाळगाव(सोनुली) येथे काल झालेल्या सार्वत्रीक लोकसभा २०२४ निवडणूक कन्हाळगाव सोनुली मतदान केंद्र क्र ३०१ या केंद्रावर रात्रो  १०.३५ वाजता पर्यंत मतदारांनी मतदान केले. झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवळणूक विभागाने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे मतदाते व कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. एक हजार तिनसे च्या वर मतदार संख्या असलेल्या  कन्हाळगाव या गावात नेहमी कोणत्याही निवडणुकीमध्ये दोन बूथ असतातच मात्र या वेळी एकच बूथाची व्यवस्था करण्यात आली होती. जास्त असलेल्या मतदारांच्या संख्येमुळे दिवसभर गर्दी च होती. त्यामुळे शेकडो मतदारांना मतदान करण्याच्या शेवटच्या सायंकाळ च्या ६ वाजता च्या वेळेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता आले नाही . यामुळे लोकांनी गर्दी केली व थोडे वेळाकरीता तनावाची स्थिती निर्माण झाली होती.  त्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला बोलाविण्यात आले. मात्र उर्वरित मतदान नंतर रात्री उशिरापर्यंत १०:३५ पर्यंत शांततेत सुरू राहीला. 
      यावेळी कन्हाळगावातील अंदाजे एकूण ८४ टक्के मतदान झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!