नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - दिनांक.२३/०४/२०२४ ला नगरपरिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी च्या माध्यमातून शाळा पूर्वतयारी कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांनी स्टॉल लावून मुलांना विविध वस्तूची ओळख करून दिली व त्या वस्तूंना मराठी तसेच इंग्रजी भाषेत काय म्हणतात त्यांचे थोडक्यात महत्त्व काय याबाबत ची सविस्तर माहिती दिली. व बुद्धिबळाच्या दृष्टीकोनातून चित्रकला , खेळांचे प्रकार , सामाजिक आणि भावनात्मक विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सक्सेना शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शेखर जिभकाटे तसेच इतर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच मुख्याध्यापक शिक्षक अनिल चेतुले सहाय्यक शिक्षक ज्योतीताई हिंगे व सोंडवले सर तसेच भोगे मॅडम मोनिका मॅडम तसेच पाल्य व चपराशी उपस्थिती होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!