चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती व मुरूमाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू - गजानन बुटके जिल्हा सरचिटनिस तथा चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य, जिल्हा परिषद, चंद्रपुर माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती
अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२४/०४/२०२४ चिमुर तालुक्यात मागील अनेक दिवसापासुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सोनेगांव (सि.), उसेगांव, गोंदोळा, वाघेडा, सिरपुर, मोटेगांव, गोरवट, चिमुर व जंगल परिसरातील नदी नाले, घाट या ठिकाणाहून सर्रास बिनधास्तपणे जे.सी.बी, मशीन आणि पोकलॅन्ड मशीन लावुन २४ तास ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातुन अवैधरित्या रेतीचा उपसा केल्या जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच चिमुर तालुक्यात मुरुमाचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केल्या जात आहे.या प्रकरणाची उपविभागीय अधिकारी यांनी आपले स्तरावर तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी तथा माफियांवर योग्य ती फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली असून प्रतिलिपी च्या माध्यमातून (१) सचिव, वने व महसुल विभाग, मंत्रालय मुंबई ३२ ,(२) आयुक्त (महसुल), नागपुर विभाग नागपुर , (३) जिल्हाधिकारी (महसुल), कार्यालय चंद्रपुर , (४) तहसिलदार, तहसिल कार्यालय चिमुर , (५) वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर व प्रादेशीक कार्यालय चिमुर/खडसंगी/पळसगांव यांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!