रेल्वेच्या धडकेत गुराखी व एक गाय ठार.
तळोधी (बा ):
नागभीड तालुक्यातील बोन्ड (राजोली) येथील रेल्वे फाटके जवळ म्हशी व गायला वाचवन्याच्या नादात गुराखीने स्वतःचा जीव गमावल्याची घटना आज दिनांक 10/4/2024 बुधवारी सकाळी 10:50 वाजताचे दरम्यान घडली.
दौलत हनाजी कुत्तरमारे (वय 70वर्ष )असे गुराख्याचे नाव असुन सदर इसम बोन्ड येथील रहिवाशी आहे.सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे दोन पाळीत जनावरे चरायला नेतात.रोजच्या प्रमाणे आजही सकाळी म्हशी आणि गायी चरायला नेण्यासाठी रेल्वे रस्ता ओलांडून जंगलात गेला.10:50 वाजता दरम्यान घरी जनावरे परत आणत असताना गोंदिया -चांदाफोर्ट ही गोंदियावरून चंद्रपूरकडे जाणारी प्यासेंजर रेल्वे जात होती. नेमक्या त्यांचवेळेस म्हशी आणि गायी रेल्वे रस्ता फाटक ओलांडून गावाच्या दिशेने येत होती. गायी व म्हशी यांना वाचवण्यासाठी सदर गुराखी गेला. रेल्वेचा धक्का लागल्यामुळे गुराखी दौलत हना कुत्तरमारे व एक गाय जागीच ठार तर एक म्हस जखमी झाली .मृतकाच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे.गावात लागलीच ही वार्ता पसरताच शोककळा पसरली.मृतक दौलत कुत्तरमारे यांचे मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!