९ लाख ८० हजारांची अवैध देशी दारू सह टाटा येस गाडी जप्त : बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : काल ९ फेब्रुवारी रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अवैध देशी दारू चीवाहतूक एका वाहनातून होत आहे. त्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून अवैध दारूचे वाहन क्र. एमएच ३३ टी ४६७३ कन्नमवार वार्ड न्यू कॉलोनी रोड येथे थांबवून तपासले असता त्यात दारू आढळून आली. पोलिसांची गाडी बघताच टाटा एस चा चालक गाडी सोडून पसार झाला. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
बल्हारपूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार आसिफराजा शेख यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवाई करीत ८० पेटी अवैध दारु सह टाटा एस गाडी कुल ९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पकडले..
सदर कारवाई पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तडी, पोलीस उपनिरीक्षक हुसैन शाह, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पोलीस हवालदार रणविजय ठाकूर, विशिष्ठ रंगारी, श्रीनिवास वाभीटकर, बाबा नैताम यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!