शालार्थ, कुबेरचा शिक्षकांना फटका — पगार अडकले

शालार्थ, कुबेरचा शिक्षकांना फटका — पगार अडकले



शालार्थ, कुबेरचा शिक्षकांना फटका — पगार अडकले

शिक्षण विभागाच्या शालार्थ आणि कुबेर या पोर्टलच्या 'अडचणी'मुळे मागील तीन महिण्यापासून मूल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे पगार अडकले असून, पगाराअभावी 'गुरूजी'ची दैनावस्था झाली आहे.

तांत्रिक अडचणीमुळे पगार अडकला असल्यांची माहिती मूलच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांनी आमचे प्रतिनिधीशी चर्चा करतांना दिली.  कॅफोमध्ये बिल गेले असल्यांने लवकरच पगाराचा तिढा सुटेल अशी माहिती त्यांनी दिली.

माहे डिसेंबर महिण्यापासून मूल तालुक्यातील गुरूजींचे पगार अडकले असल्यांची माहिती शिक्षक संघटनेच्या एका पदाधिकारीने आमचे प्रतिनिधीशी बोलतांना दिली.  मूल तालुक्यातील शिक्षकांना आलेली अडचण जिल्हयातील इतरही शिक्षकांना येत असल्यांचेही त्यांनी सांगीतले.

अनेक शिक्षकांनी, घर, वाहने, मुलांचे शिक्षणाकरीता मोठ्या प्रमाणावर कर्ज  काढलेले आहे.  तीन महिण्यापासून पगार अडकल्यांने, या सर्व कर्जाचे इएमआय थकीत झाले आहेत. इएमआय थकीतीमुळे दंडाची रक्कमही वाढत असल्यांने शिक्षकांत असंतोष निर्माण झाले आहे.

फेब्रुवारी, मार्च महिण्यातील पगारातून आयकराची गणना केली जाते.  आयकर कपात करून, पगार काढला जातो. मात्र पगाराचाच पत्ता नसल्यांने आयकर कपात कशी करावी? आयकर कपात केली नाही तर होणार्या कारवाहीस कसे समोरे जायचे? हा प्रश्न आता तालुक्यातील झेडपी गुरूजीसमोर पडला आहे.

तातडीने शिक्षकांचे पगार तातडीने करावे अशी मागणी अनेक शिक्षकांनी केली आहे.

मूल तालुक्यातील दोन शाळांच्या तांत्रिक चुकीमुळे पूर्ण तालुक्यातील शिक्षकांचे पगार अडकले.  सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम जमा करण्यांचेही काम असल्यांने पगारात विलंब झाला आहे, मात्र आताच कॅफोमध्ये बिल गेले असल्यांने सर्व पगार एकाचवेळी आणि लवकरच होणार आहे. वर्षा पिपरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मूल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!