सावली तालुक्याचा विकास हेच ध्येय - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार- सावली शहरात ५० कोटिंच्या विकास कामांचे भूमिपूजन

 सावली तालुक्याचा विकास हेच ध्येय - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
- सावली शहरात ५० कोटिंच्या विकास कामांचे भूमिपूजन

 सावली - जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सावली शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली  नगरपंचायत द्वारे आयोजित शहरातील ५० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन  सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
      चारगाव नदीवरील पुलाचे भूमिपूजन, उपजिल्हा रुग्णालय इमारत, महात्मा फुले उद्यान, नगरपंचायत इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिप उपाध्यक्ष संदीप गडमवार, माजी जिप बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार, नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, माजी पं स सभापती राकेश गडमवार, विजय कोरेवार, किशोर कारडे, पल्लवी ताटकोंडावार भारती चौधरी आदी  कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.           
      यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, देशात धर्मांधता पसरवून मनुवादी विचारसरणीने देश गुलामगिरी च्या वाटेवर आणून ठेवला असून देशाचे संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नवीन नगरपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवून या महापुरुषांचे विचार सावलीत पोहचविण्याचा संकल्प केला. भाजप इडीचे धाक दाखवून फोडाफोडीचे राजकारण करीत आहे पण मी काँग्रेस सोडणार नाही हे स्प्ष्ट करून कार्यकर्त्यांना विश्वास दिला. आयोजित कार्यक्रमास नगरसेवक, शहरातील बहुसंख्य नागरिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार चंद्रकांत गेडाम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!