प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा घोडेघाट वार्ड पवनी येथे संपन्न
तालुका - प्रतिनिधी (शेखर जिभकाटे)
पवनी : - अनुलोम प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा वस्ती घोडेघाट वार्ड पवनी विभाग विदर्भ उपविभाग भंडारा गोंदिया दिनांक.१० जानेवारी २०२४ गुरुवारला अनुगामी लोकराज्य महा अभियान अनुलोम या स्वयंसेवी संस्थेद्वारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्य राबविण्यात येणाऱ्या, योजनांची माहिती या संस्थेद्वारे अनुलोमच्या माध्यमातून सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविली जातात. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे.म्हणून अनुलोम वस्ती मित्रांना श्री प्रभू रामचंद्राची मूर्ती भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अनुलोम वस्ती मित्र संघर्ष सुरेश अवसरे यांचे घरी घोडेघाट वार्ड पवनी येथे भंडारा जिल्ह्याचे मा.संघचालक संजय काळे यांच्या हस्ते पवनी येथील श्रीराम मंदिर येथून प्रदान करण्यात आली.श्रीराम मंदिरातून प्रभू श्रीरामाची मूर्ती भजन दिंडीने वाजत गाजत घरी आणून पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी शारदा महिला भजनी मंडळ नेताजी वार्ड पवनी यांचे पूर्ण भजनी मंडळ सहभागी झाले होते.तसेच अनुलोम भागजनसेवक म्हणून शेखर बावनकर, भाजपा पवनी शहर अध्यक्ष मच्छिंद्र हटवार,भाजपा महामंत्री दत्तूभाऊ मुनरतीवार, निशांत नंदनवार,योगेश बावनकर, तबलावादक कार्तिक वानखेडे पवनी येथील तालुका कार्यवाह संघ संजय लेदे , भाजपाचे राजेश येलशेट्टीवार, डॉक्टर पतंगे सर,विलास घोडेले सर, चिंतामणी गुरुमुखी, पंकज तलवारे, तुषार तलवारे, तसेच वार्डातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळी मोठ्या प्रमाणात हजर राहून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री साहेबांनी पाठविलेल्या योजनांचे पत्र अनुलोम स्थान मित्र निशांत नंदनवार यांनी सर्व मंडळींच्या समोर वाचन केले. सर्वांनी प्रसाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!