शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस सेवा सुरु करा - डॉ. सतिश वारजुकर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे राज्य परिवहन मंडळाकडून अजूनही बहुतांश गावात बसेस सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान खाजगी वाहनचालकांकडून वाजवी भाडे आकारून विद्यार्थी तसेच प्रवाशांची लुट केली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परिवहन मंडळाने कपरला,आंबेनेरी, पारडपार,बस सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजूकर यांनी केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून कपरला, आंबेनेरी, पारडपार ही बस सेवा साळकरी विद्यार्थी यांच्या वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मिळेल त्या खाजगी वाहनांचा आधार घेऊन शाळेत पोहचत आहेत तर ब-याच विद्यार्थी वाहन नसल्याने अजूनही शाळेत वेळेवर पोहचू शकत नाहीत.या ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शहरी भागात जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र बससेवा वेळेवर नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भिती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याची दखल किसान सेल अध्यक्ष राजू भाऊ कापसे यांनी घेतली.ही संपूर्ण माहिती डॉ.सतिश वारजूकर यांना दिली माहिती मिळताच या परिसरात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ. सतिश वारजूकर यांनी विद्यार्थ्यांसोबत भेट घेतली व स्वतःचा वाहणाने विद्यार्थ्यांना सोबत नेऊन चिमूर आगारात शालेय वेळेवर बस सेवा सुरू करण्यात यावी असे आगार प्रमुखांना कळविण्यात आले. या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, किसान सेल तालुका अध्यक्ष राजूभाऊ कापसे, माजी पंचायत समिती उपसभापती स्वप्नील मालके,व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!