तलाठ्यास मारहाण: गुन्हा दाखल
तलाठ्यास मारहाण
साईनाथ बुग्गावार यांच्यावर गुन्हा दाखल
जुनासुर्ला येथील तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्यास अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याने जुनासुर्ला येथील साईनाथ बुग्गावार (वय 45) यांच्यावर मूल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. यामुळे परिसरात खळबळ वाजली आहे.
एकनाथ तानबाजी गेडेकर (४६) असे फिर्यादी तलाठी चे नाव आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजता चे दरम्यान ते कार्यालयीन कामात व्यस्त असताना, कार्यालयात हजर असलेले जुनासुर्ला येथील उपसरपंच राजू गोवर्धन यांचे सोबत साईनाथ बुगावार यांनी वाद घालणे सुरू केले.
आपण करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने आपण बुग्गावार यांना शांत करण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ केली व जबर मारहाण केली, या महाराणीत आपल्या डोळ्याच्या भागावर जखम झाल्याची लेखी तक्रार तलाठी गेडेकर यांनी मुल पोलिसांना दिली. फिर्यादीचे तक्रारीवरून पोलिसांनी साईनाथ साईनाथ बुग्गावार यांचे विरोधात भादविचे कलम ३५३, ३३२, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!