चांदली बुज. येथे आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उपक्रम
चांदली बुज. येथे आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उपक्रम
सावली - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमातून चांदली बुज. येथे आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो व्यक्तींनी सहभागी होऊन लाभ घेतला.
तालुक्यातील चांदली बुज. येथे विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी , डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर सुरु आहेत. आज चांदली बुज. येथे हजारो लोकांनी आरोग्याची व डोळ्यांची तपासणी केली. त्यात ६०० लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले तर अध्यक्षस्थानी सावली तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा उषा भोयर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभापती विजय कोरेवार, सरपंच विठ्ठल येगावार, माजी उपसभापती मंगलाताई चिमड्यालवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय मुत्यालवार,गावचे सरपंच जेष्ठ कार्यकर्ते गजानन सा.चिमड्यावार, गाव काँग्रेस कमिटी चांदलीचे अध्यक्ष विकास पुप्परेड्डीवार, माजी उपसभापती प.स सावली राजेंद्र भोयर, सेवा सहकारी अध्यक्ष विलास येंगटीवार, सावली महिला शहर अध्यक्षा भारती चौधरी, नगरसेविका पल्लवी ताटकोंडावार, नगरसेवक गुणवंत सुरमवार,ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोषवार,व सीताराम कोडापे, माजी ग्रामपंचायत सदस्या कविता मुत्यालवार, शिला गुरुनुले, गाव तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गुंडावार,पोलीस पाटील चिंतामण बालमवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, विस्तारी आरेवार, कौशल चिमड्यावार, स्वप्नील चन्नावार आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!