शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार
शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार
तळोधी बा :
तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका शासकीय शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेळछाळ केल्याने पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून नागभीड येथील शिक्षक रविन्द्र पांडुरंग नन्नावरे (वय ५६ ) यांचेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होतात परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या शिक्षकाने काल दुपारच्या ४ वाजता खेळण्यासाठी सुट्टी दरम्यान शाळेत शिकणारी अल्पवयीन १० वर्ष मुलीससबोत छेडछाड केली. ही बाब बालिकेच्या पालकांना माहिती होतात पालकांच्या तक्रारीवरून तळोधी बा.पोलीस येथे अपराध क्र.३००/२०२३ कलम ३५४ अ भांदवी सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तळोधी बा.पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी अधिकारी म्हणून तळोधी बा.पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.भाष्कर पिसे तपास करीत आहे. सदर आरोपीचा तपास केला असता आरोपी फरार असून पोलीसांकडून शोध मोहीम सुरू असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असे म्हटले जाते. तसेच त्या नराधम शिक्षकांवर ताबडतोब शिक्षण विभागाने निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोपी शिक्षक हे एका सत्ता रोड राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे वडील असल्याने प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे
तळोधी बा.पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी अधिकारी म्हणून तळोधी बा.पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.भाष्कर पिसे तपास करीत आहे. सदर आरोपीचा तपास केला असता आरोपी फरार असून पोलीसांकडून शोध मोहीम सुरू असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असे म्हटले जाते. तसेच त्या वासनांध शिक्षकांवर ताबडतोब शिक्षण विभागाने निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे व त्याला तात्काळ निलंबित नाही करण्यात आले तर गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करण्याची गावकऱ्यांनी चेतावणी दिली आहे..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!