मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दैनंदिन लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहने सुरू - नितीन कटारे माजी बांधकाम सभापती नगर परिषद चिमूर
चिमूर नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर शहरातील मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दैनंदिन लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहात असल्याने या पाण्याचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या दुकानदारांना तसेच जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने १ कि.मी अंतर गाठून पाणी फिल्टर प्लॅन्ट गाठून पाणी आणावे लागत असल्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत ची माहिती नगर परिषदेच्या पाणी पुरवठा निरीक्षक यांना दिली असता आश्वासन देण्याचे कार्य केल्या जात आहे.हि पाईपलाईन फुटल्याला ४ ते ५ दिवस दिवस झाले असून नगर परिषद यंत्रणा गर्भा दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त असल्याचे चित्र जनतेला दिसून येत आहे. आणि असेच चित्र मुख्याधिकारी असतांना दिसत असेल तर हि चिमूरकरांसाठी फार मोठा गंभीर प्रश्न आहे.तात्काळ याची दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा माजी बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!