नेरी येथे तीन दिवसीय नवरात्र महोत्सव
प्रतिनिधी : नेरी ( चिमूर )
तालुक्यातील नेरी येथे पहिल्यांदाच नवरात्र महोत्सवाचे आयोजन आमदार किर्तीकुमार भांगडीया मित्र परिवार, लोकमत सखी मंच, माँ.पार्वती चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीराम जन्मोत्सव कमिटी तसेच सर्व सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळ नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19, 20 व 21ऑक्टोबर ला तीन दिवसीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन जनता विद्यालयाच्या भव्य पटांगणावर विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा होणार आहे.
नेरी येथे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नवरात्र महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवात विदर्भ स्तरीय समूह नुत्य स्पर्धा, टी सिरीज जेष्ट गायक धीरज पांडे फेम जम्मा जागरण, तसेच विदर्भ स्तरीय गरबा दांडिया स्पर्धा आणि अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला आ. बंटी भांगडीया, आ. मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष भाजपा, अर्पना भांगडीया आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवाला राहणार असून अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात श्यामजी हटवादे सदस्य भाजपा महाराष्ट्र, संजय डोंगरे माजी अध्यक्ष सिडीसीसी बँक चंद्रपूर, राजू देवतळे उपाध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र प्रदेश, मनीष तुम्पपलिवार सचिव भाजयुमो महा. प्रदेश, मनोज मामीडवार, अल्का लोणकर, लता पिसे, शोभा पिसे, वंदना कामडी, सुनीता पिसे, माधुरी कामडी, अरून पिसे, हरिदास चांदेकर, कविता श्रीरामे, ज्योत्स्ना बोडणे आदी मान्यरासहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!