'वाम'च्या स्नेहमिलन कार्यक्रमास समाजाचा उत्स्फुर्त सहभाग
आर्य वेैश्य समाज मूलच्या वतीने वर्ल्ड आर्य वैश्य महासभा (वाम) ने आर्य वैश्य (कोमटी) समाजबांधवासाठी आयोजीत केलेल्या कोजागीरी स्नेहमिलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
स्थानिक मा. सा. कन्नमवार सभागृहात हे स्नेहमिलन घेण्यात आले. कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही वर्ष खंड पडलेले कोजागीरी स्नेहमिलन घेवून समाजबांधवांना एकत्रीत आणल्याबद्दल अनेकांनी आयोजकाचे कौतुक केले.
कुंकूम तिलक करीत, ढोल ताश्याच्या गजरात प्रत्येक समाजबांधवाचे यावेळी स्वागत करण्यात आले. स्नेहभोजनानंतर, झालेल्या कार्यक्रमात मूल तालुका आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष अजय गोगूलवार यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वामचे तालुका अध्यक्ष सचिन चिंतावार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून वाम संघटनेच्या स्थापनेमागील भूमीका समाजावून दिली. वाम संघटनेमुळे जागतीक पातळीवर आपल्या समाजाला कसे व्यासपीठ उपलब्ध झाले याबाबतची माहीती त्यांनी दिली. कार्यक्रमास वामचे जिल्हाध्यक्ष अतुल अड्यालवार, जिल्हा सचिव सुरज गुंडावार, जिल्हा सोशल मिडीया प्रचार प्रमुख विशाल कटकमवार यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली. वामचे जिल्हाध्यक्ष अतुल अड्यालवार यांनी चंद्रपूर जिल्हयात वामने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून घेतला. यावेळी वामचे राज्य कार्यकारीणी सदस्य जीवन कोंतमवार, वामचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश राॅय यांनीही वामचे पंचसुत्री कार्यक्रमाची माहीती देत, सर्व समाजबांधवानी या संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन केले.
माता कन्यका माता यांचे पुजनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या स्नेहमिलनाचे निमीत्ताने, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. ओंकार तंगडपल्लीवार यांनी गीत गायन केले. यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ, नृत्य सादर करण्यात आले.
व्यासपिठावर आर्य वैश्य समाज मूलचे सचिव धनजंय चिंतावार, वामचे कोषाध्यक्ष राजेश चिंतलवार, वामच्या महिला पदाधिकारी सौ. अनघा चिंतावार, सौ. वर्षा पडगेलवार, सौ. निता गरपल्लीवार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन सौ. सायली निर्मल पडगेलवार यांनी तर आभार प्रदर्शन सौ. अनघा चिंतावार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वामचे समन्वयक प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, किशोर गोगुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!