बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली




शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री याच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री विनोद सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे शैक्षणिक प्रभारी सौं दुर्गा कोटगले मॅडम उपस्थित होते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले श्री विनोद सर यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चरित्र व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली तसेच सौं दुर्गा कोटगले मॅडम, शिवानी वडेट्टीवार, नितु मेश्राम पल्लवी नायडू,दुर्गा आंबटकर, अर्चना येनुगवार यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे संचालन रुहीना सय्यद मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शारदा कोटगले मॅडम यांनी मानले.
महात्मा गांधी व लाला बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वछतेची शपथ घेऊन विद्यालय परिसरात स्वछता अभियान राबविण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!