सावलीत आदिवासी समाजाचा रस्ता रोको आंदोलन - शिंदे सरकारचा निषेध करित मार्ग रोखला

सावली - आदिवासी जमातीत धनगर समाजाचा समावेश करू नये व इतर आदिवासींच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी परिषद व आदिवासी संघटनानी  शासनाच्या विरोधात सावलीत उलगुलान पुकारला. सावली बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करीत शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत चंद्रपूर - गडचिरोली महामार्ग तासभर रोखून धरला. 
      धनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करीत आहे व शासन त्यांच्या मांगण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत आहे त्यामुळे आदिवासी समाज आक्रमक होत असतांना दिसत आहे. आज सावली येथे धनगरांना आदिवासीत समाविष्ट करू नये, आदिवासींच्या जागेवर बोगस नोकरी करणाऱ्यांना बडतर्फ करावे व इतर आदिवासींच्या मागण्या घेऊन सावलीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास दीड तास चंद्रपूर गडचिरोली महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम, उपाध्यक्ष लखन मेश्राम, सल्लागार युवराज उइके, सचिव अशोक कन्नाके, महासचिव कृष्णा कन्नाके, उपाध्यक्ष उत्तम गेडाम, कार्याध्यक्ष किरण गावडे, संघटक भास्कर गेडाम, रत्नाकर मेश्राम, पुरुषोत्तम पेंदाम, युवराज पेंदाम, रमेश कन्नाके, प्रमोद मडकाम, रेवताताई मडावी, गीता मडावी, कुमदेवी वलादे, अनिकेत शेडमाके, देविदास कुमरे, देवानंद कुमरे, वासुदेव मडावी, राजू कोडापे, राजू वलके, मनोहर गेडाम, जानकीराम उइके आदी  आदिवासी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!