जंगली डुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - सादागड हेटी शेतशिवारातील घटना

सावली - सादागड हेटी येथील प्रभाकर मडावी यांचेवर जंगली डुकराने हल्ला केल्याने गांभीर जखमी झाले आहेत.
   प्रभाकर मडावी हे शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असतांना अचानक जंगली डुकराने हल्ला केला. त्यात त्यांचे पायाला व हाताला गंभीर इजा झाली असून सुरवातीला ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!