नवभारत कन्या विद्यालयाच्या वतीने महात्मा गांधी जयंती संपन्न
नवभारत कन्या विद्यालय मूलच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या. या कार्यक्रमाचे निमित्ताने कलानिकेतन मूल वतीने संगीतमय भजने सादर करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, कार्तिक नंदूरकर, सौ. अर्चना बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विजय सिध्दावार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल निमगडे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!