नेफडो टीम मुल आणि नगर परिषद मुल तर्फे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम




प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल 

भारत सरकारच्या आदेशानुसार कचरा मुक्त भारत अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून नेफडो टीम मुल,नगर परिषद मुल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुल, वसुंधरा टीम आणि स्वच्छता मित्र टीम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१/१०/२०२३ ला मुल येथील गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला सन्मा. पवार सर नायब तहसीलदार मुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहीमेला सुरुवात करण्यात आली.गांधी चौकातील चारही रस्त्यांची वेगवेगळ्या टीम द्वारे स्वच्छता करण्यात आली.नंतर प्रत्येक वार्डात टीम नुसार विभागणी करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.*प्रसंगी सन्मा. पवार सर नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगरपालिका मुल, श्रीकांत समर्थ पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता नगर परिषद मुल, तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, ललिता मुस्कावार नागपूर विभाग उपाध्यक्षा, श्रीरंग नागोसे नागपूर विभाग उपाध्यक्ष, कविता मोहुर्ले नागपूर विभाग सचिव, नलिनी आडेपवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, राकेश ठाकरे चंद्रपूर जिल्हा युवा उपाध्यक्ष,मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा, कुमुदिनी भोयर मुल तालुका युवती अध्यक्षा, पुजा मोहुर्ले शहर संघटीका,नंदुभाऊ रणदिवे माजी उपाध्यक्ष नगर परिषद, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुल चे कर्मचारी, विद्यार्थी, स्वच्छता मित्र, नगर परिषद मुल चे स्वच्छता कर्मचारी, सफाई कामगार आणि मुल येथील अनेक स्वच्छता प्रेमी आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!