डॉ.स्नेहा नरेंद्र मेश्राम ने मिळविले एमपीएससी परीक्षेत सुयश
महात्मा फुले विद्यालय, तळोधी (बाळापूर) येथे माध्यमिक शिक्षण घेतलेल्या डॉ.स्नेहा चे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी वर्ग-अ परीक्षेत डॉ.स्नेहा नरेंद्र मेश्राम हिची निवड होत वर्ग अ अधिकारी होण्यास तिच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे. डॉ.स्नेहा चे माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालय, तळोधी (बाळापूर) येथे झाले. पुढील शिक्षण शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथून पदवी तर पदव्युत्तर शिक्षण शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे झाले.डॉ स्नेहाचे वडील श्री नरेंद्र मेश्राम महात्मा फुले उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम, तळोधी (बाळापूर) येथे पूर्ण वेळ शिक्षक( प्रात्यक्षिक) या पदावर कार्यरत आहेत. डॉ.स्नेहा ने मिळवलेल्या यशाबद्दल कल्याण शिक्षण संस्था नागपूरचे अध्यक्ष मा.उन्मेषजी गेडाम साहेब,सरचिटणीस सौ.मालतीताई गेडाम मॅडम, श्री गोविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ रॉय सर,महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री जी.जे.बुलबुले सर,उपप्राचार्य श्री ए.एन.कोराने सर,पर्यवेक्षक पी.एम.कोहपरे सर तसेच महात्मा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,प्राध्यापकांनी अभिनंदन केले. डॉ.स्नेहाने आपल्या यशाचे श्रेय आजी,आई-वडील, बहीण,भाऊ तसेच आप्तेष्ट व आपल्या शिक्षक- प्राध्यापकांना दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!