येलो मोझाक,करपा रोगामुळे सोयाबीन पिकांची नुकसान....



पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी...

वरोरा....जगदीश पेदाम

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये सोयाबीन पिके असून  झालेल्या मुसळधार पावसामुळे शेगाव,चारगाव तसेच परिसरात शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येलो मोझाक तसेच करपा रोगामुळे  सोयाबीन पिकांचीमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

तालुक्यातील शेगाव, चारगाव, अर्जुनी, धानोली, दादापूर, मानोरा, कोकेवाडा, किनाळा, आष्टा,  परिसरातील  सर्व नदी नाले अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ओवर फ्लो वाहून तसेच परिसरातील असलेल्या चारगाव मध्यम प्रकल्प धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने महारुद्र रूप प्राप्त करून सर्वत्र पाण्याचे अच्छादन पसरत शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते या महाभयानक पुराणे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर असलेले पिके वाहून गेले असताना शेतामध्ये असलेल्या पिकांमधून सावरत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची महागडी औषधी वापरत फवारणी  करत जोपासना केली असता पुन्हा आलेल्या पावसाने पिके नष्ट करत सोयाबीन पिकाला येलो मोझाक व करपा रोगामुळे शेतात उभी असलेली पिके नष्ट होत असताना शेतकऱ्यांचा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आहे. त्यामुळेच युद्ध पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्व शेतीची पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवा शेतकरी शरद कष्टी यांनी केलेली आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!