गावातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी नविन पर्यटन गेट सुरु करा - बफर झोन क्षेत्रातील तळोधी नाईक गाववासियांची मागणी
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - खडसंगी बफर परिक्षेत्रातील तळोधी (नाईक) उपक्षेत्रातील नियतक्षेत्र तळोधी १ मध्ये येत असलेल्या तळोधी (ना) हे गाव बफर क्षेत्रात येत असुन येथील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नसुन तसेच वन्यप्राण्याचा शेतकऱ्यांना दिवसेंदिवस सामना करावा लागत आहे. या परिसरात अनेक गावे बफर झोन क्षेत्राला लागून असुन, वन्य प्राण्यांचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. तर वन्य प्राण्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले. त्यामुळे शेती करणे अवघड होत असुन उपजिविका भागविण्यासाठी कठीण होत असल्याने गावामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. गावातील लोकसंख्या अंदाजे ३ हजार आहे. वरिल गावातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी नियतक्षेत्र तळोधी १ मधील कक्ष क्र. ४३ मध्ये येत असलेल्या चौऱ्यादेव कुटी जवळील परिसरात नविन निसर्ग पर्यटन गेटला मंजुरी प्रदान करावी. जेणेकरून गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अशी मागणी तळोधी नाईक येथील गावकऱ्यांनी वन विभागाचे बफर झोन चे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे याच्याकडे निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.
करिता सदर निवेदनाचा सहानुभुतीपुर्वक विचार करून नविन निसर्ग गेटला मंजुरी प्रदान करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना वन समिती तळोधी नाईकचे अध्यक्ष किशोर येसांबरे, सरपंच मदनपाल येसांबरे, माजी सरपंच कलीम शेख, उपसरपंच प्रकाश धानोरकर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर रणदिवे, सुनंदा रंदये,रेखा प्रभाकर चौधरी, पोलीस पाटील रामप्रभू नागदेवते, रमेश भोयर, गुणवंत दहिकर, सुनील खाटे, अंकुश मेश्राम,राजेंद्र दहिकर, नयन कावरे, शिला भोयर, माजी सरपंच पार्वता किन्नाके, कमल वाकडे, वच्छला भंडारे, रेखा शामसुंदर चौधरी, अरुण मेश्राम, राजू मेश्राम, घुमदेव गजभे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!