शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धे करीता चांदणी शर्माची निवड..



वरोरा....जगदीश पेंदाम

क्रीडा संकुल चंद्रपूर येथे शालेय जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अंडर 14 मुली मद्ये विभागाकरीता एकूण 5 मुलींची निवड करण्यात आली. या मध्ये वरोरा तालुक्यातीलनेहरू विद्यालय शेगाव बूज येथिल वर्ग 8 वी ची विद्यार्थिनी कुमारी चांदणी शर्मा ही साडेचार गुण प्राप्त करून विभागीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड झालेली आहे..
प्रथम परिणीता आर्डे, द्वितीय दीपिका जामुनकर,तृतीय लावण्या बोरकुटे तर चतुर्थ चांदणी शर्मा,पाचवी गुंजन वलके हे सर्व चंद्रपूर जिल्हा चे प्रतिनिधित्व करणार आहेत. या 5 मुली मधून दीपिका जामुनकर, चांदणी शर्मा, गुंजन वलके या वरोरा तालुक्यातील असून ग्रामीण भागात शिकतात. 2022 ते 2023 या सत्रा मद्ये फीडे रेटिंग प्राप्त नरेन्द्र गुरुदास कन्नाके सर यांनी वर्षभर प्रशिक्षण सोबतच निवड स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. याचाच फायदा या मुलींना झाला असून भविष्यात नक्कीच यश संपादन करतील अशी आशा आहे. निवड झाल्या बद्दल मुख्याध्यापक बी. जी. ढाकुणकर सर, प्रशिक्षक नरेंद्र कन्नाके सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!