शेतात लावलेल्या विद्युत ताराच्या प्रवाहाणे वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यक्ती ठार/नागभीड मधील घटना
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्य प्राणी सह दोन व्यक्ती ठार झाल्याची घटना नागभीड पोलीस नोंदीवरून घेण्यात आली आहे.
नागभीड शहराला लागून असलेल्या शेताशिवारात वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात हौदोस असल्याने शेत पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये यासाठी शेतकरी यांना झटका लागून वन्य प्राणी नुकसान करू नये अशी वन विभागाकडून व्यवस्था केली जाते मात्र शेतकरी वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या झटका मशीन ऐवजी विद्युत ताराचा प्रवाह सोडून बंदोबस्त करीत असतात यामुळे आज नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घटना दिसून येत आहेत. काल दिनांक १९जानेवारीला शेतकरी नारायण दामोधर लेणेकर ह्यांनीआपल्या शेतात पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये म्हणून बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह आपल्या शेतात सोडण्यात आला होता यावेळी या प्रवाहात वन्य प्राणी डुकर अडकून ठार झाला तर त्याचेच शेताचे बाजूला असलेला शेतकरी गुरुदास श्रीहरी पिसे(५२) रा.नागभीड ताराच्या प्रवाहात अडकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असता शेतकरी नारायण लेणेकर यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदविली.
तसेच दुसरी घटना नागभीड शेतशिवारातच दुसरा शेतकरी दाचेवार यांची भाड्याने शेती करतो तो काल सायंकाळी सायकलने पाण्याची मोटार पम्प सुरु करण्यास गेला असता त्याला विद्युत ताराचा प्रवाहाचा स्पर्श होऊन अडकल्याने देवनाथ रामदास बावनकर वय ४५, नागभीड हे दोघेही प्रवाहाणे ठार झाले असून सदरचा गुन्हा दाखल करून न्यायालयात शेतकऱ्यांस हजर करण्यात आले असता मा न्यायालयाने न्यायालय कोठडी सुनावली असून अपराध क्रमांक ३४४/२४अन्वये कलम ३०४भा द वी दाखल करून पोलीस निरीक्षक योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आकाश साखरे पुढील तपास करीत आहे सदर घटनेचा वन विभाग, वीज वितरण कंपनी यांनीही आपला पंचनामा करून गुन्हा दाखल केला असल्याचे विस्वासनिय सूत्राकडून कळते.
एकाच दिवशी गणेश चतुर्थी च्या दिवशी दोन शेतकरी गेल्याने नागभीड मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!