खातेरा येथे सामूहिक फळबाग लागवड उदघाट्न संपन्न
सिंदेवाही (वार्ताहर)
सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा ग्रामपंचायत आणि आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खातेरा येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचा उपक्रम राबविण्यात आला, गावाचा शाश्वत विकास व्हावा, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या संकल्पनेतून फळबाग लागवड करण्यात येत आहे,या उदघाट्ना प्रसंगी कार्यरत सरपंच सौ. सुनीता मडावी, गावचे पोलीस पाटील श्री राजेंद्र कुंभरे, आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन चे विकास अधिकारी सतीश समृतवार सर, सी. एफ.शांताराम आदे, डोलेंद्रकुमार चचाने, श्री पंकेशजी मडावी, रोजगार सेवक संजय धारणे, भोजराज आळे, श्रीहरी सिडाम, आणि गावातील नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!