शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मते यांचे नेतृत्वात मुल तालुकाप्रमुख पदी आकाश कावडे तर मूल शहर प्रमुख पदी श्री विशाल नागुलवार यांची नियुक्ती




*माननीय एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने तथा माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार माननीय श्री नितीन मते  शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यातील अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश या पक्ष प्रवेशात मोलाची भूमिका बजाविणारे श्री कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, श्री विनोदजी चांदेकर विधानसभा  प्रमुख बल्लारपूर विधानसभा, श्री पंकज वडेट्टीवार तालुकाप्रमुख पोंभुर्णा यांच्या विशेष प्रयत्नाने आज श्री आकाश कावडे, श्री विशाल नागुलवारव, श्री अफजल वाढई यांनी श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेने मध्ये वरोरा येथील कार्यालयात पक्ष प्रवेश केला . यावेळी श्री आकाश कावडे यांची मूल तालुका प्रमुख पदी नियुक्ती तर श्री अफजल वाढई यांची तालुका संघटक पदी व श्री विशाल नागुलवार यांची मूल शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी त्यांचे समवेत मुल येथील काही निवडक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नितिन मते यांनी करून घेतला व पक्ष वाढी संदर्भात सूचना देऊन मूल तालुक्यात प्रत्येक गावात शाखाप्रमुखाची नियुक्ती, बूथ प्रमुखाची नियुक्ती तसेच मूल शहरात शिवसेना शाखेची स्थापना, शाखाप्रमुखाची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हा प्रमुख नितीन मते यांनी दिल्या व पक्ष बांधनिसाठी जोमाने कामाला लागा लागेल ती मदत,सहकार्य,आपल्याला देण्यात येईल करण्यात येईल असे सुध्दा सांगितले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!