पत्रकार टिल्लू पंप डबेवाले चंद्रशेखर बावनकुळे ची जीभ घसरली
राज्याचे भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे बुध कार्यकर्त्याना संबोधीत करतांना, त्यांनी जीभ घसरली आणि ते पत्रकारांना चक्क टिल्लू पंपवाले, डबेवाले असा अनुदाराने उल्लेख करून, या पत्रकारांना दरमहिण्याला चहासाठी ढाब्यावर घेवून जा, चहा प्यायला म्हणजे समजले तुम्हाला असे म्हणत पत्रकारांचा अपमान केल्यांने, पत्रकारांत संतापाची भावना निर्माण झाली आहे?
महायुतीचे विरोधात 2024 च्या निवडणूकीपर्यंत कोणतीही बातमी येवू नये यासाठी आपल्या परिसरातील चार पाच पत्रकाराची यादी बनवा आणि त्यांना ढाब्यावर चहा प्यायला बोलवा, आपल्या निगेटिव्ह कोणतीही बातमी येवू नये, सर्व बातम्या आपल्याच बाजुने आल्या पाहिजेत असे वादग्रस्त वक्तव्य बावनकुडे यांनी केल्यांने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे हे जबाबदारी लोकप्रतिनिधी असतांना त्यांनी पत्रकारांचा अपमान करणे, त्यांना अपमानास्पद शब्दप्रयोग करणे हे निंदनीय आहे. एक पत्रकार म्हणून मी चंद्रशेखर बावनकुडे यांचा निषेध करतो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!